Valentine Day : व्हॅलेंटाईन डेच्या आदल्यादिवशी बायकाेची हत्या केल्याचे झालं उघड; नव-यास अटक

Crime Before Valentine Day: पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राेशनीकुमार यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली.
mumbai , police,  arrests, youth, dharavi
mumbai , police, arrests, youth, dharaviSaam Tv

Dharavi Crime News : धारावी (dharavi) येथे एका २४ वर्षीय महिलेचा (women) गळा दाबून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खून प्रकरणी पाेलिसांनी (police) महिलेचा पती (husband) कन्हैयालाल सरोज (वय २६) याला अटक (arrest) केली आहे.

धारावी येथील शताब्दी नगर येथे रोशनीकुमार सरोज (वय २४) या विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शनिवारी मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

mumbai , police,  arrests, youth, dharavi
Maharashtra : दारू पिऊन मित्राला सांगितला किस्सा; 'तिच्या' सह नऊ जणांना पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या

पाेलिसांनी रोशनीकुमार यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (lokmanya tilak hospital) नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला हाेता. (Maharashtra News)

दरम्यान रोशनीकुमार यांचे वडील सुरेशकुमार सरोज यांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी त्यांचे पती कन्हैयालाल सरोज यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राेशनीकुमार यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आला.

mumbai , police,  arrests, youth, dharavi
Shivendraraje Bhosale News: काेयता हल्ला, गाेळीबार प्रकरणानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली 'ही' भीती

पतीस अटक केली आहे. वडिलांनी हुंड्यासाठी त्यांच्या मुलीचा मानसिक आणि शरारिक छळ केला जात हाेता अशी देखील तक्रार केली आहे. महिलेच्या सासू सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com