Ambernath Crime News : चॉपरने वार करून मोबाईल चाेरला; पाेलिसांनी युवकास ठाेकल्या बेडया

या घटनेतील एक जण अद्याप फरार आहे.
Crime News, Ambernath
Crime News, AmbernathSaamTv

Ambernath News : अंबरनाथमध्ये (ambernath) कामावर जायला निघालेल्या व्यक्तीवर चॉपरने वार करून त्याचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police) एका चोरट्याला बेड्या (arrest) ठोकल्या आहेत.

Crime News, Ambernath
Soyabean Price : साेयाबीन, कापसाचा दर घसरला; काँग्रेसचा आंदाेलनाचा इशारा

अंबरनाथच्या (ambernath) चिखलोली ठाकूरपाडा परिसरात राहणारे पुष्पराज कोरी हे साेमवारी सकाळी सातच्या सुमारास आनंदनगर एमआयडीसीतील प्रियदर्शनी मायक्रोटेक या कंपनीत कामावर जाण्यासाठी पायी निघाले होते. वाटेत प्रेशरॉन स्टील या कंपनीसमोर ते आले असता अचानक दुचाकीवरून दोन जण आले आणि त्यांनी पुष्पराज यांच्याशी झटापटी करत थेट त्यांच्यावर चॉपरने वार केले.

ही झटापटी सुरू असतानाच एक बस चालक पुष्पराज यांच्या मदतीसाठी आला. यावेळी या दोन चोरट्यांनी पुष्पराज यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Crime News, Ambernath
Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात धागडधिंगा घालणा-यांना वनखात्याने ठाेठावला दहा हजारांचा दंड

पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या सहाय्याने विष्णू उर्फ बंड्या लहाने याला उल्हासनगरच्या आंबेडकर नगर परिसरातून ताब्यात घेतले. पाेलिस चाैकशीनंतर लहाने यास अटक करण्यात आली. त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बंड्या लहाने यांच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईलही हस्तगत केला. (Maharashtra News)

त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सुद्धा चोरीची असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का ? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत अशी माहिती अशोक भगत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com