Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरण राजकीय वैमनस्यातून; पंढरीनाथ फडके अटकेत, ३२ जणांवर गुन्हा दाखल

रविवारी भर दिवसा घडली हाेती घटना.
Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patil
Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patilsaam tv

Ambernath : अंबरनाथ येथे रविवारी झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. हा हल्ला राजकीय स्पर्धेतून झाल्याचा आरोप हल्ला झालेले राहुल पाटील (rahul patil) यांनी केला आहे. केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील (kunal patil) यांचंही नाव संशयित आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Ambernath Latest Marathi News)

दरम्यान अंदाधुंद गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर पोलीस पंढरीनाथ फडके यांच्या शोधात होते. अखेर नवी मुंबईतून पंढरीनाथ फडके (pandharinath phadke) यांना अटक करून रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलच्या पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patil
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' च्या मतमाेजणीस प्रारंभ

राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद असल्यामुळे हा हल्ला त्याच वादातून झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा हल्ला राजकीय स्पर्धेतून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patil
Vedat Marathe Veer Daudale Saat : महेश मांजरेकरांचा निषेध असाे..., भाेसरे गावात रात्री निघाला माेर्चा

राहुल पाटील हे केडीएमसीच्या आडीवली प्रभागातून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्याच प्रभागातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचं त्यांच्याशी राजकीय वैमनस्य निर्माण झालं आहे. त्यातच राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत कुणाल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांनी मिळून राहुल पाटील यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप राहुल पाटील यांनी त्यांच्या जबाबात केला आहे. (Maharashtra News)

Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patil
Pratapgad : अफजल खान, सय्यद बंडा व्यतरिक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' दाेन कबरी काेणाच्या ?

त्यामुळे पोलिसांनी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचं नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Ambernath, pandherinath phadke, rahul patil, kunal patil
Satara News : आप्पा मांढरे गाेळीबार प्रकरण; धक्कादायक माहिती उघड, युवक पाेलिसांच्या ताब्यात

दरम्यान, अंदाधुंद गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर पोलीस पंढरीनाथ फडके यांच्या शोधात होते. अखेर नवी मुंबईतून (navi mumbai) पंढरीनाथ फडके यांना अटक करून रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. या प्रकरणामुळे सुरुवातीला बैलगाडा शर्यतीमुळे झालेला हा हल्ला प्रत्यक्षात मात्र राजकीय स्पर्धा संपवण्यासाठीचा हल्ला असल्याचं समोर आलं असून यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com