
Ambernath News : अंबरनाथ येथे केलेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत दहा संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. तसेच संशयितांकडून चार वाहनं जप्त केली आहेत. दरम्यान या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील याचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
अंबरनाथ येथे रविवारी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर अंदाधुंद गोळीबार करण्यापर्यंत गेले. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी रात्री पंढरीनाथ फडके यांच्यासह एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांना अटक केली होती. तर मंगळवारी केतन देशमुख याला पोलिसांनी अटक केली.
पाेलिसांनी (police) बुधवारी आणखी सहा जणांना बेड्या (arrest) ठोकल्या. यामध्ये सतीश अंबु फडके (२८), संदेश अनंता फडके (३०), प्रशांत नाथा फडके (२७), संदीप पोशा जाले (४१), समीर काळूराम खुटले (२६), महेश बळीराम म्हात्रे (४९) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पनवेल तालुक्यातील राहणारे आहेत. (Breaking Marathi News)
त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चार गाड्या जप्त केल्या आहेत. उर्वरित २२ संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी आठ पथकं रवाना केली आहेत. सर्व संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. (Maharashtra News)
दरम्यान, या प्रकरणात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचंही नाव संशयित आरोपी म्हणून आल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. कुणाल पाटील यांचा शोध सुरु असल्याची पोलिसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.