Pimpri Chinchwad Crime News : अंमली पदार्थ विकणाऱ्या राजस्थानच्या युवकांना पुण्यात अटक

संशयितांची पोलीस कसून चाैकशी करीत आहे.
pimpri chinchwad
pimpri chinchwadsaam tv

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटीसिटी परिसरात एमडी ड्रग्स आणि पॉपी पावडर सारखे अतिशय घातक अंमली पदार्थ विकणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी पकडले. हे दाेघे राजस्थानी पेडलर असून अंमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. (Maharashtra News)

pimpri chinchwad
Talegaon Dabhade Water Supply News : तळेगांव दाभाडेतील 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

हे दाेन्ही संशयित आयटी अभियंता तरुण-तरुणींना अंमली पदार्थ विक्री करण्यासाठीं येणारं आहेत अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी दाेघांना पकडले.

या दोन्ही ड्रग्स पेडलर यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसाच्या अंमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने जवळपास 1 किलो 750 ग्रॅम अफूचा चुरा, 61 ग्रॅम एमडीड्रग्स जप्त केला आहे.

pimpri chinchwad
Mumbai High Court News : विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विराेध, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रवीप्रकाश सुखराम बिश्नोई आणि सुरेशकुमार साईराम बिश्नोई अशी अटक (arrests) केलेल्या संशयितांची नावे आहेत. रवीप्रकाश बिश्नोई आणि सुरेशकुमार बिश्नोई हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. ते पुणे शहरात राहून हिंजवडी आयटी सिटी परिसरामध्ये आयटी अभियंत्यांना अंमली पदार्थाची विक्री करत होते असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com