चक्क पोलिसाने साजरा केला सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस; जोगेश्वरी पोलिसाचा प्रताप

मुंबईतील जोगेश्वरी पोलिसानी चक्क एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
चक्क पोलिसाने साजरा केला सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस; जोगेश्वरी पोलिसाचा प्रताप
चक्क पोलिसाने साजरा केला सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस; जोगेश्वरी पोलिसाचा प्रतापSaam Tv

मुंबई : मुंबईमध्ये Mumbai गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबई पोलिसांकडून Mumbai Police गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी मुंबईतील जोगेश्वरी Jogeshwari पोलिसानी चक्क एका सराईत गुन्हेगाराचा Criminal वाढदिवस Birthday साजरा केल्याचा व्हिडिओ Videoसमोर आला आहे. 

जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीतील गुन्हेगाराच्या घरी गेल्या आठवड्यात वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे सध्या पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

हे देखील पहा -

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगाराचा अशाप्रकारे वाढदिवस साजरा करणे योग्य आहे का अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस महेंद्र नेर्लेकर हे निर्बंध पायदळी तुडवत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. 

संबंधित आरोपीचे नावदानिश इष्टीखार सय्यद असे असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यात सीआर नंबर १६५/२०१८ च्या कमल ३०७,१४८,५०४ अंतर्गत दानिशवर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दानिशवर अनेक गंभीर गुन्हे जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

चक्क पोलिसाने साजरा केला सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस; जोगेश्वरी पोलिसाचा प्रताप
युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा

मात्र सध्या त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. दानिशचा काही दिवसांपूर्वी  वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दानिशच्या घरी दाखल झाले होते. त्यांनी दानिश च्या वाढदिवसाचा केप कापत त्याचा वाढदिवस साजरा केला. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com