बारामतीत ओबीसी आरक्षण मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली
बारामतीत ओबीसी आरक्षण मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारलीSaam Tv

बारामतीत ओबीसी आरक्षण मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात कलम 149 अन्वये आरक्षण कृती समितीला नोटीस बजावली आहे.

बारामती - बारामती Baramati 29 जुलै रोजी ओबीसी OBC यलगार महामोर्चा Morcha होणार असल्याचे आरक्षण कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या corona पार्श्वभूमीवर बारामती शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी Police या मोर्चाची परवानगी नाकारली आहे. ही परवानगी नाकारल्याने वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे Namdeo Shinde यांनी यासंदर्भात कलम 149 अन्वये आरक्षण कृती समितीला नोटीस बजावली आहे.

हे देखील पहा -

या आंदोलनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंत्री विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ रासपाचेअध्यक्ष महादेव जानकर भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे पंकजा मुंडे माजी आमदार योगेश टिळेकर खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आरक्षण कृती समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.

बारामतीत ओबीसी आरक्षण मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली
महादेव खोरी परिसरात युवकाचा निर्घृण खून; पाेलिसांचे पथक रवाना

मात्र आता पोलिसांनी नोटीस पाठवली आहे त्या नोटीस वर आरक्षण कृती समितीच्या वतीने स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या विषयावरून बारामतीत ओबीसी आरक्षण कृती समितीचे नेते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात याची उत्सुकता लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com