Pune: मोठी कारवाई! बेकायदेशीर गर्भ तपासणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गाडीमध्ये दोन इसम गर्भवती महिलेची गर्भ तपासणी करताना आढळून आले.
Indapur Police
Indapur PoliceSaam TV

पुणे: इंदापुर तालुक्यातील सुरवड भांडगाव रस्त्याच्या कडेला बलेनो कार (एम. एच.११ सी जी ८०१६ ) या गाडीमध्ये काही लोक फिरून गर्भवती महिलांची बेकायदेशीरपणे गर्भाचे लिंगपरिक्षण करीत असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष मारुती खामकर यांना मिळाली यावरून वैद्यकिय पथकाने इंदापूर पोलीसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यातील आरोपी विरूध्द् पीसीपीएनडीटी कायद्याचे कलम २३, २५ व २९ नुसार प्रथम वर्गदंडाधिकारी इंदापूर यांच्या न्यायालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. खामकर यांनी कायदेशिर फिर्याद दिली आहे.

Indapur Police
सुप्रिया सुळेंनी मानले राज ठाकरे, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे जाहीर आभार!

सुरवड येथील भांडगाव रोडजवळ संशयित बलेंनो कार थांबलेली पोलीसांना दिसल्यानंतर छापा टाकला असता गाडीमध्ये दोन इसम गर्भवती महिलेची गर्भ तपासणी करताना आढळून आले. प्रविण पोपटराव देशमुख, धंदा लॅब टेक्निशियन व तौशिफ अहमद शेख, धंदा चालक (दोघेरा. राजाळे ता. फलटण जि सातारा) येथील आहेत. कारमध्ये लिंगपरिक्षण मशिन दोन नग, मोबाईल दोन नग व इतर वैद्यकिय साहित्य आढळले आहे.

वैद्यकिय अधिक्षक यांनी पंचासमक्ष ते जप्त केले. ताब्यात घेतलेल्या इसमानकडुन सखोल चौकशी केली असता कोळेगाव येथील डॉ. सुशांत हणुमंत मोरे, डॉ. हणुमंत ज्ञानेश्वर मोरे व सौ. कमल हणुमंत मोरे सर्व रा. कोळेगाव ता.माळशिरस जि.सोलापुर यांनी मिळून आतापर्यंत अनेक गर्भवती महिलाचे गर्भाचे लिंगपरिक्षण केल्याचे चौकशीमध्ये सांगितले आहे. तसेच सदर गर्भवती महिलेला सुध्दा तपासणीसाठी त्याच डॉक्टरांनी पाठविलेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com