भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच ठेवलं कोंडून, अन्...
PoliceSaam Tv

भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच ठेवलं कोंडून, अन्...

भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्यानंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनला (Mahatma Phule police station) त्या पोलिसांनी संपर्क करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोंडून ठेवलेल्या पोलिसांची सुटका केली. पोलिसांना कोंडून ठेवणाऱ्या दोन इसमासह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना (two culprit arrested) अटक केली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली. शौकत शेख आणि इशाद बागवाण अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

Police
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी धक्का; दिग्गज खेळाडू रुग्णालयात दाखल

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात असलेल्या एका गोडाऊन मध्ये रेल्वेचे चोरी केलेलं भंगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी भंगार ठेवलेल्या गोडाऊन मध्ये गेले होते. गोडाऊन मध्ये जाताच त्याठिकाणी असलेल्या शौकत याने शटर बंद करत त्यांना चक्क गोडावून मध्ये कोंडून ठेवत बाहेरून कुलूप लावलं.कर्मचारी जयेश गोसावी आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीसानी घटनास्थळी धाव घेत या कर्मचाऱ्याची सुटका करत कोंडून ठेवणाऱ्या शौकत शेख आणि इशाद बागवानला त्यांचा साथीदार अस्लम शेख विरोधात गुन्हा दाखल केला.त्यानंतर शौकत शेख आणि इशाद बागवानला पोलिसांनी अटक केली. चोरीचे भंगार ठेवणारा अस्लम शेख अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.