Pune : संतोष जगताप हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलीसांनी पकडले

जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँगवारमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे
Pune : संतोष जगताप हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलीसांनी पकडले
Pune : संतोष जगताप हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलीसांनी पकडलेSaam Tv

पुणे : जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँगवारमधून gangwar दिवसाढवळ्या गोळीबाराची firing घटना घडली आहे. २ टोळ्यांमध्ये भर रस्त्यावर गोळीबार झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी 22 ऑक्टोबर दिवशी लोणीकाळभोर lonikalbhor परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली आहे.

या गोळीबारात संतोष जगताप santosh jagatap याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल सोनई समोर ही धक्कादायक घटना घडली आहे. संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावर हॉटेल सोनई समोरून जात असताना. त्यावेळी तिथे ५ जणांनी संतोष जगताप याच्यावर हल्ला चढविला होता. या हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्याराबरोबर हल्ला चढवत गोळीबार केला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये संतोष जगताप हा गंभीर जखमी झाला आहे, तर त्याचे अंगरक्षकही जखमी झाले आहेत. पण जखमी अवस्थेत संतोष जगतापने हल्लेखोरांवर प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला आहे. त्यामध्ये एक हल्लेखोर ठार झाला, तर बाकीचे हल्लेखोर पळून पसार झाले आहे. संतोष जगताप आणि त्याच्या जखमी अंगरक्षकांना लोणी काळभोर याठिकाणी विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परंतु, उपचारापूर्वी संतोष जगताप यांचा मृत्यू झाला होता. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युद्ध भडकले होते. या गँगवॉरमध्ये अप्पा लोंढे टोळीमधील संतोष जगताप त्याच्यासोबत अजून दोघे होते. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संतोष जगताप याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.

Pune : संतोष जगताप हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलीसांनी पकडले
उसनवारीच्या पैशावरून यवतमाळमध्ये महिलेचा खून; मुलगाही गंभीर जखमी

राहू या ठिकाणी बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे आणि त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर होता. या प्रकरणी जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. त्यानंतर आता संतोष जगताप यांची सुद्धा भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे.

उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणातील दोन आरोपीना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपीचा शोधही पोलिस घेत आहेत. या घटनेनंतर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप याचा अंगरक्षक शैलेंद्रसिंह सिंग (वय- ४३, रा. चंदनगर) याच्या गोळीबारात खैरेचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २ स्वतंत्र खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे दिसत आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आंहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com