Mumbai : अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा

Notice From Mumbai Police To MNS Workers : खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत.
Mumbai : अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा
Notice From Mumbai Police To MNS Workers Saam Tv

रुपाली बडवे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महाआरती करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या तीन तारखेला अक्षय्यतृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी मनसैनिक ठिक-ठिकाणी महाआरती करणार आहेत. मात्र या महाआरतीसाठी (MahaAarti) मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर महाआरती आणि सामना कार्यालयाच्या बाहेर बॅनर्स लावल्याने मुंबई पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. (Police notice sent to MNS Workers in the background of Akshaya Tritiya)

हे देखील पाहा -

मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर बॅनर आणि शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा लावलेल्या मनसे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माहीम विभागातही लक्ष्मण पाटील, उमेश गावडे या मनसे पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या नोटीस आल्या आहेत. राज्यात सध्या तणावाची परिस्थिती असून महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यास कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया एकाच दिवशी येत असल्याने काही काही जणांकडून शांतता भंग केली जाऊ शकते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. ४ तारखेनंतर जिथे-जिथे भोंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लावणार, असं राज ठाकरे म्हणाले औरंगाबादच्या सभेत म्हणाले होते. सरळ मार्गाने कोण ऐकत नसतील तर हेच करावे लागेल, असंही ठाकरे म्हणाले होते.

Notice From Mumbai Police To MNS Workers
चलो अयोध्या! औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्येत 'राज'गर्जना; मनसैनिक लागले कामाला

दरम्यान औरंगाबादच्या सभेनंतर आता राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठीचे बॅनर्स (Banners) मुंबईत झळकायल सुरुवात झाली आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला अजून बराच वेळ आहे. जून महिन्याच्या पाच तारखेला हा दौरा (Tour) होत असला तरी मनसैनिकांनी आतापासूनच या दौऱ्याचा याचा प्रचार-प्रसार करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत (Mumbai) या दौऱ्यासाठीचे बॅनर्स लागले असून राज ठाकरेच्या या दौऱ्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन या बॅनर्समधून करण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.