Pune Crime News : रोझरी स्कूलनजीक टाेळक्याचे पाेलिसांवर गाेळीबार, एक जखमी; झटापटीनंतर 5 अटकेत (पाहा व्हिडिओ)

या घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Pune Crime News, Warje
Pune Crime News, Warjesaam tv

- सचिन जाधव

Pune News : पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी व कर्मचा-यांवर वारजे माळवाडी येथे काही जणांनी गाेळीबार केला. या घटनेत एक पाेलिस कर्मचारी जखमी झाला. प्रत्युत्तरात पाेलिसांनी टाेळक्यास आव्हान दिले. त्यानंतर झालेल्या झटापटीनंतर पाेलिसांनी पाच जणांना अटक केली. (Maharashtra News)

Pune Crime News, Warje
Ajit Pawar News : 'अजित पवार साता-याचे पालकमंत्री ? तुम्हांला काय वाटतं...' (पाहा व्हिडिओ)

वारजे माळवाडी (warje malvadi) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूलच्या (rosary school) जवळ रात्री १ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जण संशयास्पद हालचाली करताना पाेलिसांना दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयिताने पोलीसांच्या दिशेने अग्नीशस्त्र रोखत फायर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील संशयितांना आव्हान दिले.

Pune Crime News, Warje
Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे तुळजाभवानी अभिषेक पुजेच्या शुल्कात माेठी वाढ, साेमवारपासून अंमलबजावणी; पुजा-यांचा विराेध

पाच जणांना अटक

यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका संशयिताचने पाेलिस कर्मचारी कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच संशयितांना पळून जात असताना पाेलिसांनी (police) पकडले.

त्यानंतर इतर चार ते पाच जणांवर पोलिसांनी फायरिंग केली असता ते अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. या घटनेतील संशयितांचा शोध सुरु आहे. या घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Pune Crime News, Warje
Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

शस्त्र जप्त

दरम्यान या घटनेबाबत गुन्हे शाखाचे उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले या घटनेतील ताब्यात घेण्यात आलेल्या संशियतांकडून एक गावठी कट्टा, त्यामध्ये जिवंत चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

एटीएम हाेणार हाेते लक्ष्य

ताब्यात घेतलेले संशयित आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले. अधिक तपास सुरू असल्याचे झेंडे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com