Kalyan: मोनालिसा बारवर पोलिसांचा छापा; 56 जण ताब्यात!

कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील मोनालिसा बारवर कल्याण गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास छापा टाकला.
Kalyan: मोनालिसा बारवर पोलिसांचा छापा; 56 जण ताब्यात!
Kalyan: मोनालिसा बारवर पोलिसांचा छापा; 56 जण ताब्यात!प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पूर्वेतील Kalyan East हाजीमलंग रोडवरील मोनालिसा बारवर कल्याण गुन्हे शाखेने kalyan Crime Branch शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास छापा टाकला. यात 21 महिला, 30 ग्राहक व बारचालकासह वेटर मिळून 5 असे एकूण 56 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 78 हजार किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला मोनालीसा बार मालक व चालक हे बिना नोकरनामा व परवाना बार चालवित आहेत. शिवाय बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांची सर्व्हिस दिली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली होती.

Kalyan: मोनालिसा बारवर पोलिसांचा छापा; 56 जण ताब्यात!
यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारवर छापा टाकत कारवाई केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 56 जणांवर कारवाई करीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. मालशेटे यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com