Police Bharti 2021: 6 जिल्ह्यातील 444 केंद्रांवर होणार पोलीस भरती परीक्षा; महत्वाची माहिती

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदाकरिता १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
Police Bharti 2021: 6 जिल्ह्यातील 444 केंद्रांवर होणार पोलीस भरती परीक्षा; महत्वाची माहिती
Police Bharti 2021: 6 जिल्ह्यातील 444 केंद्रांवर होणार पोलीस भरती परीक्षा; महत्वाची माहितीSaam Tv

पुणे : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदाकरिता १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ६ जिल्ह्यात ४४४ परीक्षा केंद्र उभा राहणार आहेत. याकरिता ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

हे देखील पहा-

त्याकरिता पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरामधून तरुणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये पात्र ठरलेल्या १९०३१९ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींची संख्या मोठी असल्यामुळे त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. यामुळे याअगोदर ३ ते ४ वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. लेखी परीक्षा शुक्रवार १९ नोव्हेंबर दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी दुपारी १ पासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.

हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्याकरिता परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्याकरिता भरारी पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. ५ केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि इतर ३ पोलीस, असे ४ जणांचा या प्रत्येक पथकामध्ये समावेश राहणार आहे. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे.

Police Bharti 2021: 6 जिल्ह्यातील 444 केंद्रांवर होणार पोलीस भरती परीक्षा; महत्वाची माहिती
अमरावती : 36 सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचार भडकला...

या जिल्ह्यात परीक्षा केंद्र-

-नागपूर मध्ये ४७ केंद्र २४९९४ परीक्षार्थी

-नाशिक मध्ये ३१ केंद्र १३८०० परीक्षार्थी

-औरंगाबाद मध्ये ७७ केंद्र २१७२३ परीक्षार्थी

-सोलापूर मध्ये २५ केंद्र ११८७८ परीक्षार्थी

-अहमदनगर मध्ये ४७ केंद्र १७०६८ परीक्षार्थी

-पुणे मध्ये २१७ केंद्र १००८५६ परीक्षार्थी

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com