
पुणे : येथील पोलीस प्रशासनात खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Shivajinagar Police) कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील शिंदे (४८) असे आत्महत्या (police ends life) केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदम वाकवस्ती मध्ये राहत होते. काल बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे शिंदे त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मात्र, आज सकाळपासूनच त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यांच्या मुलाने आवाज देऊनही शिंदे यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून पाहिले. त्यानंतर शिंदे यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं त्याच्या निर्दशनास आलं. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.