
भूषण शिंदे
Mumbai News: जिथे सत्ता जाते किंवा सत्ता आणायची असते तिथे दंगली घडवतात, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. आदित्य ठाकरे आज त्यांच्या मतदारसंघांमध्ये म्हणजेच वरळीमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते.
भाजपचे समीकरण आहे जिथे सत्ता जाते किंवा सत्ता आणायची असते तिथे दंगली घडवतात. अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, एकही दंगल घडली नाही, याची आठवणही आदित्य ठाकरे यांनी करुन दिली.
कर्नाटकने दाखवलं गद्दारी चालणार नाही
देशातील जी तीन त्यांनी राज्य ढापली त्याचं नेमकं काय होणार हे कर्नाटकाच्या निवडणुकातून स्पष्ट झालं आहे. ज्यांनी कर्नाटकात गद्दारी केली त्यातील 17 जणांपैकी 16 उमेदवार पराभूत झाले. इतर 30 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले की गद्दारी चालणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. (Latest News Update)
आता कर्नाटकप्रमाणे गद्दारी करून ढापलेले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे देखील असाच निकाल लागणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार. आपण लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हणतो. कर्नाटकच्या निकालामधून असं दिसतंय की आगामी महानगरपालिका निवडणुका या २०२४ मध्ये होतील. निवडणुका लागत नाहीयेत, असं चालल तर कसं होईल? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केली.
निवडणूक आयोग निवडणूक घेणार आहे की नाही?
चुकून त्यांनी कर्नाटकची निवडणूक लावली आणि पराभव झाला. निवडणूक आयोग निवडणूक घेणार आहे की नाही? की लोकशाही मारून टाकणार आहे. गद्दार आणि भाजपच्या मनात भीती आहे त्यामुळे निवडणुका लागत नाहीत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.