Ajit Pawar Prediction: १६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही, अजित पवारांच्या म्हणण्यामागचं गणित काय?

Ajit Pawar Prediction: 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncp
Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncpsaam tv

Mumbai News : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. तरीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार या चर्चा सुरुच आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा दिला असला तरी 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कायम आहे. याबाबतचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरले तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की 16 आमदार अपात्र ठरले तरीही सरकारच्या बहुमतावर काहीही परिणाम होणार नाही.

कॅलक्युलेशन काय असेल?

अजित पवार यांनी सरकारकडे बहुमत कसं राहील, याचं गणितच समजवून सांगितलं. शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारकडे 172 आमदार राहतात. राज्यात बहुमतासाठीची मॅजिक फिगर 145 आहे. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरले तरी फार परिणाम होईल असे वाटत नाही. (Latest Political News)

Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncp
Karnataka Next CM: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेसकडून 3 फॉर्म्युल्यांचा विचार; डीके शिवकुमार यांचं काय होणार?

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की, व्हीपचा अधिकार नेमका कुणाला, हे आधी ठरवणार आहे. पक्षात फुट असल्याचं मला कुणीही सांगितलं नाही. फुटीबाबतचं पत्र माझ्याकडं आलं नाही, त्यामुळं पक्षात फुट, असं म्हणू शकत नाही. दोन्ही बाजूंना म्हणणं मांडायला वेळ देणार असल्याचं ते म्हणाले. .(Latest Marathi News)

राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले ते योग्य होते. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता अन् बहुतम सिद्ध करु शकले नसते तर? ते म्हणाले, मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र मला हा भाग मान्य नाही. कोणतीही चूक होऊ नये यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. लवकरात लवकर घेण्याचा माझा प्रयत्न आहे. गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घेणार आहे. मात्र माझाच निर्णय अंतिम असणार आहे.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com