Kalyan News : भाजप नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले; लोकसभा निवडणूक जड जाणार?

Shivsena News : इतर कोणताही उमेदवार दिल्यास आम्ही तो मान्य करणार नाही असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला आहे.
Shrikant Shinde News
Shrikant Shinde NewsSaam tv

Kalyan News : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर एकत्र दौरे करताना दिसत आहेत. भाजप-शिवसेना युती किती भक्कम आहे हे दाखवण्याची दोन्ही नेते एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याणमध्ये भाजपने दंड थोपटले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी असहकार पुकारला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सांगू तोच उमेदवार अशी भूमिका भाजपने स्थानिक पातळीवर घेतली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना आगामी निवडणूक जड जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Political News)

Shrikant Shinde News
Death Threat to Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

आम्ही सांगू तो उमेदवार

गुरुवारी कल्याणमध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही सांगू तोच उमेदवार अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. इतर कोणताही उमेदवार दिल्यास आम्ही तो मान्य करणार नाही, असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला आहे. (Latest Political News)

Shrikant Shinde News
Balasaheb Thorat News : कुणीही दावा केला तरी पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, अजित पवारांना बाळासाहेब थोरातांचं उत्तर

भाजप नेत्यांच्या नाराजीचं कारण

भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे.

नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत शिंदे गटाला सहकार्य न करण्याचं आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्ण य भाजप नेत्यांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com