Ramdas Athwale on Ajit Pawar: अजित पवार आमच्या पक्षात आले तर त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ, आठवलेंची खुली ऑफर

Ramdas Athwale on Ajit Pawar: अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल.
Ajit Pawar-ramdas Athwale
Ajit Pawar-ramdas AthwaleSaam TV

Ramdas Athwale on Ajiit Pawar: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचा दावा अंजली दमानिया यांना केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अशा चर्चा निरर्थक असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी प्रत्यक्षरित्या दिलं आहे. या सर्व चर्चांवर बोलताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं की, अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. (Political News)

Ajit Pawar-ramdas Athwale
Cm Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

रामदास आठवले यांनी म्हटलं की, अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. पवारसाहेबांनी त्यांना अनेक पदं दिली आहेत. मध्यंतरी अजित पवार आजारी होते म्हणून नॅाट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत, म्हणून त्यांनी एकदा पहाटे शपथ घेतली होती.पण आता तसं होणार नाही.

अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे.

Ajit Pawar-ramdas Athwale
Nagpur Vajramuth Sabha: नागपुरातील वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी, पण 'हे' नियम पाळावेच लागतील!

आदित्य ठाकरे मातोश्रीवर येऊन रडले होते, या आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर बोलताना आठवले यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत.

आपल्या कवितेच्या शैलीत टीका करताना पुढे त्यांनी म्हटलं की, ते रडले म्हणून उद्धव ठाकरे पडले. चंद्रकांत पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरेंबाबतच्या वक्तव्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com