
जयश्री मोरे
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचा खासदार संजय राऊत यांनी नव्या संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नवीन संसद भवन जे उभारलं आहे त्याला आमचा विरोध नाही. त्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
काय वेळ फडणवीस यांच्यावर आली
काल एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सारथ्य केलं. यावरुन संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याची आमच्यावर वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं. बाळासाहेबांनी बेईमानांना कधीच मांडीवर घेतलं नाही. गद्दारांना हाकलून द्या असे ते म्हणायचे. देवेंद्र फडणवीस हे गद्दारांच्या गाड्या चालवत होते, काय वेळ फडणवीस यांच्यावर आली आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला. (Political News)
संसदेचं उद्घाटना राष्ट्रपतींचा अधिकार
राष्ट्रपती यांचा तो अधिकार आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून पुढच्या सगळ्या प्रक्रिया सुरू होतात. आपण फक्त पॉलिटिकल इव्हेंट साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करायचे ठरवले आहे. यामुळे देशाच्या घटनेवर, संविधानावर हल्ला होतो आहे. याला आमचा विरोध आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. (Latest News Update)
चमचे चाटुगिरी करणाऱ्यांना बोलवलं जातं
चमचे चाटुगिरी करतात, जे मोदींच्या भजन मंडळात सहभागी होतात त्यांना बोलावलं जातं. पण राष्ट्रपती या संसदेच्या प्रमुख आहेत, त्यांनाच पंतप्रधानांनी बोलवलं नाही. तुम्ही राष्ट्रपतींनाच बोलवले नाही तर आमच्यासारख्यांची काय अवस्था आहे? बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कधीही कोणत्याही व्यक्तीला विरोध केला नाही, भूमिकांना त्यांनी विरोध केला आहे, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.