नवनीत राणांच्या 'त्या' फोटोवर राजकारण चुकीचे; राजेश टोपेंनी शिवसेनेचे कान टोचले

फोटो काढणे चुकीचे आहे, या प्रकरणी चौकशी केली जाईल, असंही टोपे म्हणाले.
नवनीत राणांच्या 'त्या' फोटोवर राजकारण चुकीचे; राजेश टोपेंनी शिवसेनेचे कान टोचले
Rajesh Tope Saam TV

मुंबई: खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या लीलावती रुग्णालयातील फोटोवर आक्षेप घेत शिवसेनेने लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांवर आरोप केले होते. या फोटोवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आता यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. टोपे यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली आहे. फोटोंच्याबाबत चर्चा करणे चुकीचे आहे. याचे राजकारण करणे चुकीचे आहे, अशी टीका मंत्री टोपे यांनी शिवसेनेवर (Shivsena)नाव न घेता केली.

Rajesh Tope
Breaking राजद्रोहाच्या कायद्यातील कलमाला तुर्तास स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जामीन मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी लीलावती रुग्णालयातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन शिवसेनेनं नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लीलावती रुग्णालयात भेट देवून डॉक्टरांना फोटो विषयी जाब विचारण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांवर आरोप करण्यात आले होते.

नवनीत राणांच्या फोटो प्रकरणावर बोलताना टोपे म्हणाले, फोटो काढणे हा नियमाचा भाग नाही. फोटो काढून व्हायरल करणे, त्यांच्याबाबत चर्चा करणे, याचे राजकारण करणे चुकीचे आहे, असं टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत.

Rajesh Tope
लीलावती रुग्णालयाला BMCचा दणका; नवनीत राणा प्रकरणात पाठवली नोटीस

कोरोना स्थितीवर बोलताना टोपे म्हणाले, रुग्णांची वाढण्याची गती कमी आहे. त्यामुळे चौथी लाट येणार असं नाही. सेंट्रल कौन्सिल झाली त्यात देशातील सगळे आरोग्य मंत्री होते. दिल्लीचे आरोग्यमंत्री, पंजाबचे आरोग्यमंत्री यांना मी रुग्णसंख्या वाढीबाबत प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी केसेस वाढताहेत पण जास्त नाही. रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत, घरीच उपचार घेत आहेत, असं त्यांनी सांगितले. काळजी करण्याचा विषय नाही. राज्यातील रुग्णसंख्येवर माझे लक्ष आहे. जर वाढले तर आवश्यक ती करवाई करू, असंही टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.