साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत शिवसेनेने केली शेतकऱ्याला मदत...

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या शेतकऱ्याला म्हैस आणि वासरू घेऊन दिले. त्यामुळे दुःखात असलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं आहे.
साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत शिवसेनेने केली शेतकऱ्याला मदत...
साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत शिवसेनेने केली शेतकऱ्याला मदत...प्रदीप भगणे

कल्याण - सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे heavy rain मलंगगडच्या malanggad नदीला पूर आला होता. या पुरामध्ये चिंचवली chinchavali गावातील शेतकरी नामदेव म्हात्रे यांच्या तीन म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. याची बातमी साम टीव्हीने सर्वात पहिले दाखवली होती. याच बातमी दखल घेत positive impact of saam tv news शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड mahesh gaikwad यांनी या शेतकऱ्याला म्हैस आणि वासरू घेऊन दिले. त्यामुळे दुःखात असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं आहे. सदर शेतकरी आणि त्याच्या परिवाराने महेश गायकवाड यांचे आभार मानले आहे. यावेळी चैनू जाधव, समाजसेवक विलास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख राजेश फुलोरे, उपशाखा प्रमुख पिंटू म्हात्रे, विभाग प्रमुख अशोक म्हात्रे आणि रोशना पाटील उपस्थित होते. positive impact of saam tv news shivsena help farmer in kalyan

हे देखील वाचा -

याबाबत नेवाळी ग्रामपंचायत सदस्य चैनू जाधव यांनी सांगितले की सोमवारी झालेल्या अतिवृष्टीत नेवाळी ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली गावातील नामदेव म्हात्रे या शेतकऱ्याच्या तीन म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या.आम्ही ती बातमी पाहिली यानंतर शिवसेनेचे कल्याण पूर्व येथील नगरसेवक महेश गायकवाड यांनी ती पोस्ट केली. त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क साधून शेतकऱ्यासंदर्भात विचारपूस केली आणि तातडीने महेश गायकवाड यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि कल्याणच्या बाजारातून kalyan market एक म्हैस Buffalo विकत घेण्यासाठी सांगितले, त्यासाठी लागणारे पैसे देखील त्यांनी दिले आणि आम्ही थेट नामदेव म्हात्रे या शेतकऱ्याला म्हैस आणि वासरू दिले.

साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत शिवसेनेने केली शेतकऱ्याला मदत...
कोट्यावधी खर्चुनही वसई-विरार महापालिकेचा 'स्मार्ट प्लॅन' फेल?

आपल्या कल्याण पूर्वेत असे खूप लोक प्रतिनिधी आहेत ज्यांची महिन्याची इन्कम कोट्यवधींच्या घरात आहे, पण आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर अतीवृष्टी असेल, चक्रीवादळ असेल यामध्ये जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांचं मलंगगड परिसरात नुकसान झालं तेव्हा तेव्हा आम्हाला मदत करणारे महेश गायकवाड आहेत. मी नेवाळी ग्रामपंचायतीच्या वतीने महेश गायकवाड यांचे आभार व्यक्त करतो, अशा भावना शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com