Shivsena: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून 'वाघा'चे चिन्ह मागण्याची शक्यता, पण...

Shivsena Tiger News : निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.
Shivsena Tiger Logo
Shivsena Tiger LogoSaam TV

मुंबई: अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून (Shivsena) वाघाचे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (by-election) शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं तर मग तोंडावर आलेल्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे. तर निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. (Mumbai Politics News)

Shivsena Tiger Logo
Mumbai Crime: सफरचंदांच्या आयातीखाली अंमली पदार्थांची तस्करी; मुंबई विमानतळावर 502 कोटींचे कोकेन जप्त

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात आज निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने ८०० पानांचा ई-रिप्लाय सादर केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला भेट देऊन ही माहिती माध्यमांना दिली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आज प्रत्यक्षात भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्यासोबत असल्याचं सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

Shivsena Tiger Logo
Mumbai : कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; अनेक नागरिक अडकले

ठाकरे गटाने काल, शुक्रवारी १८० प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावत आज, शनिवारी २ वाजेपर्यत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार ठाकरे गटाने आज ८०० पानांचा ई-रिप्लाय सादर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com