Video: विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही; प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

पक्षाने ठरल्यानुसार आमच्या पक्षातील नऊ मतं संजय पवारांना दिली असे देखील प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.
Video: विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही; प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
Praful PatelSaam Tv

नागपूर - राज्यसभा निवडणुक (Rajya Sabha Election 2022) अपेक्षेपेक्षा अतिशय रंगतदार झाली. राज्यसभेची सहावी जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. या जागेवर भाजपने (BJP) विजय मिळवला असून भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवार विजय झाले. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात आल्यावर ते प्रतिनिधींशी बोलत होते.

आमच्या तिन्ही पक्षाचा जर हिशोब केला तर आमची मेजॉरिटी आहे. दुसरी गोष्टी म्हणजे अपक्ष आणि आमच्यासोबत असलेल्या लहान पक्षांनी आवर्जून महाविकास आघाडीलाच मतदान केले. आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. मात्र, आम्हाला अपक्षांचे चार ते पाच मिळाले नाही. तसेच एक मत अवैध ठरवले गेले. आमचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Praful Patel
आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन तुफान दगडफेक; गाड्यांचे नुकसान

महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत फुटले नाही. काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असू शकते. काही लोकांची काही क्षणिक छोट्या मोठ्या कामासाठी नाराजी असू शकते आता त्याच्या खोलात जावे लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मी पण ५१ मते घेऊ शकलो असतो आणि दुसऱ्या क्रमांकाचे मी संजय पवार यांना देऊ शकलो असतो पण आमच्या पक्षाने ठरवलं होत की आम्ही ४२ मत घ्यायचे पण मला १ मत जास्त कुठून मिळालं याचं मला संशोधन करावं लागेल. पण असू शकतो एखादा प्रेम करणार ज्यांनी मला मत दिल असेल. पक्षाने ठरल्यानुसार आमच्या पक्षातील नऊ मतं संजय पवारांना दिली असे देखील प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com