
मुंबई : पुणे पोटनिवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लागला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या पराभवावर बोलताना म्हटलं की, मोदी देखील पराभूत होऊ शकतात.
प्रकाश आंबेडकर यांनी आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेतील. या भेटीनंतर बोलताना त्यांनी म्हटलं, की सरळ लढाईमध्ये भाजप हरते हे आज दिसलं. भाजप आणि मोदी हे देखील हरू शकतात हे आम्ही आधी देखील म्हणत होतो. कसब्याच्या निकालाने ते सिद्ध केलं आहे. कसब्यात निवडणूक जिंकली कारण दुसरं कुणी मैदानात नव्हतं.
चिंचवड निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, राहुल कलाटे यांना उमेदवारी द्यावी ही आमची भूमिका होती. भाजप आणि RSS यांना हरवणे हा एक उद्देश असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं.
आमची युती शिवसेनेसोबत आहे. महाविकास आघाडीसोबत निर्णय उद्धवजी घेतील. आज मुंबईतील जागा वाटपावरून चर्चा झाली. राज्यातील सत्तासंघर्षाची दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली आणि २० तारखेला प्रकरण निकालासाठी ठेवलं आहे.
निकाल लागल्यास निवडणूक आयोगाला निवडणुका घ्यावा लागतील. त्यामुळे लवकरात लवकर सीट शेअरिंग व्हावं याबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडीमधील राहिलेले मुद्दे लवकर सोडवावे. तत्काळ निवडणुका घोषित झाल्या तर आपण मागे राहू नये, असं आंबेडकर यांनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.