
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Cetral Government) लष्कर भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ही योजना फसवी असल्याचं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. योजनेच्या निषेधार्थ देशभरातील अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. बिहारमध्ये तर आंदोलक विद्यार्थ्यांकडून रेल्वेच्या डब्यांना आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. भारताला वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी अग्निपथ योजना मोदी सरकारने आणली असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. (Prakash Ambedkar Slams Modi Government For Agneepath Scheme)
हे देखील पाहा -
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. पुढे ते म्हणाले की, मोदी सरकारला सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करायचा आहे आणि बेरोजगार तरुण सैनिक निर्माण कराचे आहेत. जेणेकरून बेरोजगार तरुणांचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल आणि भारताला वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एकिकडे अनेक तरुणांचा या अग्निपथ योजनेला विरोध आहे. या विरोधात आता वंचितनेही उडी घेतली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे. अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांच्या जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला करत ते पेटवून दिले आहे. नवाडाच्या अटुआ येथील भाजप कार्यालयाला आग (Fire) लागली आहे. हजारो संतप्त आंदोलकांनी भाजपचे कार्यालय पेटवून दिले.
कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून सैन्यात भरती थांबली आहे. पूर्वी जिथे नवीन सैनिकांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागत होते आणि वेतनश्रेणीही कमी होती. आता तिथे फक्त ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. लष्करातील पहिले निवृत्तीचे वय सुमारे ४० वर्षे होते. त्याचबरोबर आता नव्या नियमांनुसार पहिली ४ वर्षे सैनिकांची भरती होणार आहे. आता सैनिकांना कमी पगार मिळतो, पण नवीन नियमानुसार त्यांना सुमारे ३० हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर सैनिकांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. ४ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर सुमारे ७५ टक्के जवान निवृत्त होतील. त्या बदल्यात त्यांना १० ते १२ लाख रुपयांची आकर्षक रक्कम दिली जाईल. तर २५ टक्के जवानांना दीर्घ कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.