Breaking - प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा ( पहा व्हिडिओ )

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत एक अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
Breaking - प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा ( पहा व्हिडिओ )
Breaking प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा ( पहा व्हिडिओ )Saam Tv

मुंबई - ऍड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत एक अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात ३ महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. व्यक्तिगत कारणासाठी मी पक्ष कार्यापासून तीन महिने लांब राहणार आहे. पक्ष आणि संघटना हे चालेल पाहिजे आंदोलनाला आपण सुरवात केली आहे.

पुढे ते म्हणले की, ५ जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहेत आणि म्हणून पक्षालाअध्यक्ष असणे महत्वाचे आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रभारीअध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि इतर सर्वे कार्यकर्ते त्यांना मदत करून पक्ष यशस्वीरीत्या आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करूया. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी रेखा ठाकूर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com