BJP
BJPsaam tv

BJP : भाजप नेत्याने पुन्हा मागितली जनतेची माफी म्हणाले, शिवरायांबद्दल...

आज पुन्हा एकदा प्रसाद लाड दिलगिरी व्यक्त केली आहे.

Prasad Lad On Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सातत्याने आक्षेपार्ह व्यक्तव्य केली जात आहेत. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मग सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा आणि त्यानंतर आता काही दिवसांनपूर्वी प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपतींबाबत आक्षेपार्ह विधान केली. त्यानंतर सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात येत आहे.

BJP
Pune : साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रकला अपघात; युवकाने जीव वाचविण्यासाठी तलावात मारली उडी

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड बॅकफुटवर गेले आहेत. आज पुन्हा एकदा प्रसाद लाड दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की माझा कुठलाही दुसरा हेतू नाही, आपण कोकणात वाढलेली पोर आहोत याचमुळे हा कोकण महोत्सव आपण आयोजित करत आहोत. सर्वाना एकत्र घेऊन आम्ही कोकणासाठी काम करत आहोत. मागच्या अडीच वर्षात कोकणाला कॅलिफोर्निया करू असे पर्यावरण मंत्री म्हणाले होते पण ते साधे कोकणात देखील आले नाहीत असा टोला देखील प्रसाद यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना लागला आहे. सहा दिवस आपण वेगवेगळ्या परिषदा ठेवल्या आहेत.ज्यांचा यामध्ये अभ्यास आहे त्यांना बोलावले आहेत असेही ते म्हणाले.

BJP
Navapur News: कारागृहाबाहेर चोवीस तास पहारा तरीही पाच कैदी फरार; स्वच्छतागृहाची खिडकी तोडून पसार

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. काल कोकण मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com