....हे तर कालचे पिट्टू - गोपाळ लांडगे

शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दरेकर यांना लक्ष्य करत पिट्टूची उपमा दिली आहे.
....हे तर कालचे पिट्टू - गोपाळ लांडगे
....हे तर कालचे पिट्टू - गोपाळ लांडगेप्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar हे डोंबिवली Dombivali दौऱ्यावर आले असताना, त्यांनी शिवसेनेला Shivsena लक्ष्य केलं होतं. दरेकर यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका केली होती.आता याला शिवसेना कडून उत्तर देण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे Gopal Landge यांनी दरेकर यांना लक्ष्य करत पिट्टूची उपमा दिली आहे.

हे देखील पहा -

दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे मुख्यमंत्री, पालकमंत्री शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे तरी सुद्धा विकास काम अर्धवट का असा सवाल करत दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली होती. आता याला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीत शिवसंपर्क अभियान राबवत मेळावे घेतले जात आहेत.

....हे तर कालचे पिट्टू - गोपाळ लांडगे
शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू

काल डोंबिवली मध्ये एक मेळावा घेण्यात आला त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना उत्तर देत टीका केली. लांडगे यांनी सांगितले की, गेले २५ वर्षात अशे अनेक महान नेते होऊन गेले, हे तर कालचे पिट्टू आहे.

त्यामुळे पंचवीस वर्षात शिवसेनेने केलेली विकास कामे जनतेला माहिती असून जनता पुन्हा एकदा शिवसेनेलाच कौल देईल असे लांडगे यांनी सांगितले. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com