Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला साद

अशा घटनांमुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला साद
Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला सादSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्य सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी आता तरी जागा व्हाव, दिशा कायदा शक्ती कायदा कुठे गेला ? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोध पक्ष नेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी राज्य सरकला साद घातली आहे. तसेच अशा घटनांमुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. Pravin Darekar On Sakinaka Rape Case

हे देखील पहा-

प्रवीण दरेकर राजावाडी रुग्णालयात भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मागील काही दिवसात सातत्याने होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांविषयी खंत व्यक्त केली. पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडलेले सामूहिक बलात्कारचे, तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक अत्याचार याविषयी रोष व्यक्त केला.

मुंबईच्या वैभवाला काळिमा;

ते पुढे म्हणाले की, मुंबई हे सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते, रात्रदिवस महिला येथे प्रवास करत असतात. परंतु काल घडलेल्या घटनेने मुंबईच्या वैभवाला काळिमा फासली आहे. विरोधे पक्ष नेते म्हणून आम्ही काय गप्प बसायचं का? पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल दरेकरांनी विचारला आहे.

Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला साद
महा ई-सेवा केंद्राचा कारनामा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

मी हात जोडून विनंती करतो;

तसेच पुढे दुःख व्यक्त करत दरेकर म्हणाले, कितीही बोलले तरी पीडितेच्या जीव काही परत येणार नाही. मी हात जोडून विनंती करतो की आता तरी जागे व्हा. वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे जर जनतेचा उद्रेक झाला तर ते सरकारला परवडणार नाही. आता कुठल्याची घटनेचं समर्थन होणार नाही. तर सरकारने दोन दिवसात Action Plan तयार करावा आणि दोन दिवसात तयार करावा.

साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यू;

दरम्यान, साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape case) पिडीतेचे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड (khairani road) परवा एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याचे वृत्त समोर आले होते. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात या पीडितेवर उपचाहर सुरु होते. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती होती. पीडितेची प्रकृती परिस्थिती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com