"शरद पवारांची पत्रकार परिषद तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी"

'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात अनेक गोष्टीचा ऊहापोह झाला.
"शरद पवारांची पत्रकार परिषद तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी"
"शरद पवारांची पत्रकार परिषद तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी"Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशातील एकूणच घडलेल्या प्रकरणांमध्ये हात घातला. त्यावर त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात अनेक गोष्टीचा ऊहापोह झाला. त्यांच्या मुद्द्याचे उत्तर वस्तूस्थित मी सांगणार आहे. "मावळ गोळीबाराला भाजप जबाबदार", शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला त्यावर दरेकर म्हणाले, लखीमपूर घटनेबाबत बोलत असताना त्यांनी मावळ घटनेचा उल्लेख केला. मावळ घटना ही भाजपच्या नेत्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना उकसवले म्हणून घडल्याचे पवार म्हणाले, तिथे कसे आंदोलन झाले हे अख्या महाराष्ट्राने पाहिल. त्या ठिकाणी झालेला गोळीबार आठवला नाही. आता मावळचे खापर पोलिसांवर फोडायचे काम सत्ताधारी करत आहेत.'

हे देखील पहा-

जे जागतिक पातळीवर वाईट परिणाम झाले त्याचे परिणाम भारतालाही झालेत. देशाचे पंतप्रधान मोदी आहेत ते चांगला मार्ग नक्की काढतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सरकारचा महत्वाचा आक्रोश आहे की, यंत्रणांचा गौरवापर होत आहे. परंतु या तपास यंत्रणांनी वाझचे धागेदोरे शोधल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्यामुळे असे आरोप होत आहेत. असे म्हणत तपस यंत्रणांना दोष देणाऱ्यांवर दरेकरांनी उत्तर दिल.

...मग नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा;

योगी सरकारने कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहराज्याच्या मुलासाठी केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. मग नवाब मलिक यांच्या जावयामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. परमबीर सिंग फरार आहेत यावर बोलत नाहीत. ज्येष्ठ नेत्यांनी तपास यंत्रनांची पाठ थोपटवायला हवी. या अशा वक्तव्यामुळे यंत्रणाना बळ मिळण्याऐवजी ते ड्रग्स तस्करांना बळ मिळत आहे.

"शरद पवारांची पत्रकार परिषद तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी"
Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु

राष्ट्रवादीला भाजपबाबत किती पोटशूळ;

आजही जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. पवार साहेबांना आपण चार वेळा मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून द्यावी लागते. याचा अर्थ राष्ट्रवादीला भाजपबाबत पोटशूळ किती आहे हे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. यांना असे वाटले होते महाराष्ट्र म्हणजे आमची मक्तेदारी आहे.मात्र आज देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या राज्यात उभे राहिले याचा पोटशूळ या लोकांना होत आहे.

...तेव्हा हिताचे राजकारण होत होते;

साखर कारखानदारी, सहकार हे राज्याचे कधीकाळी वैभव होते. तेव्हा हिताचे राजकारण होत होते. आज ती कारखानदारी शेतकऱ्यांच्या हिताची आहे की कारखानदारांसाठी आहे. शेतकऱ्याच्या हिताचे राजकारण करायचे की कारखानदाराच्या हिताचे राजकारण करायचे याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. शून्य रुपयात कारखाना हडप करण्याचे काम सुरू आहे. ते शोधण्याचे काम या तपास यंत्रणा करत आहेत. शेतकऱ्याच्या हिताचे राजकारण केले पाहिजे. त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. ईडीचा गौरवापर, केंद्रित यंत्रनांचा गैरवापर होतो असे म्हणतात. मला देखील नोटीसा आल्या ती काय प्रेम भावना होती का? आपल्या सोयीचे झाले नाही तर यंत्रणांचा गौरवापर असे म्हणायचे.

पवारांची पत्रकार परिषद ही तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी वाटली. यंत्रणाना दोष देऊ नये. पाहुण्यानी कसे रहावे हे घरमालकाने ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.

"शरद पवारांची पत्रकार परिषद तपास यंत्रणावर अविश्वास दाखवणारी"
प्रॉपर्टीचा वाद! सासऱ्याने केले सुनेवर वार, घर पेटवून घेतला गळफास

राष्ट्रवादीची पोस्टरबाजी;

आता सरकार यांचे आहे. पोलीस खाते यांचे आहे. मग कारवाई का नाही करत. त्यांना जर वाटत असेल की किरीट सोमय्या यांनी आधी काढलेल्या प्रकरणात तथ्य आहे तर त्यांनी चौकशी करावी.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने वेगळा निर्णय घ्यायला हवा;

शेतकऱ्यांइतकाच एसटी कर्मचाऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने वेगळा निर्णय घ्यायला हवा. त्यांना तुटपुंजी मदत करायची आणि पुन्हा त्यांना पगारासाठी वाट बघायला लावायची हे योग्य नाही. त्यामुळे राज्याने एसटी कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा.

Related Stories

No stories found.