नवाब मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत; प्रविण दरेकरांचा आरोप
नवाब मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत; प्रविण दरेकरांचा आरोपSaamTv

नवाब मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत; प्रविण दरेकरांचा आरोप

मलिकांच्या जावयाला एनसीबीने अटक केली म्हणून आम्ही राष्ट्रवादी ला जबाबदार धरायच का?

मंबई : एनसीबीने NCB केलेली कारवाई ही ठरवून केलेली असून या कारवाई मध्ये काही तथ्य नाही तसेच या कारवाई मागे भाजपचे काहीतरी मोठे कारस्थान असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी केला होता. याच आरोपांना उत्तर देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर Pravin darekar यांनी मलिकांवरती पलटवार केला आहे. 'उगाच मलिक सनसनाटी निर्माण करत आहेत' तसेच ही केलेली कारवाई महत्वाच असल्याचही दरेकर म्हणाले आहेत.(Pravin Darekar's allegation against Nawab Malik)

मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना दरेकर म्हणाले कायदा सर्वांना समान आहे. एखाद्या प्रकरणात मलिकांच्या जावयाला एनसीबीने अटक NCB Arrest केली मग आता आम्ही राष्ट्रवादी ला जबाबदार धरायच का? तसंच भाजप नेत्याचा मुलगा त्या प्रकरणात आहे का हे सिद्ध व्हायचा आहे. मुंबई पोलीस Mumabi Police तुमचं आहे कॉल रेकॉर्ड तपासू शकतात, पण कोणता तरी तिर मलिक मारत आहेत असं देखील दरेकर म्हणाले.

नवाब मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत; प्रविण दरेकरांचा आरोप
ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !

मलिक सनसनाटी निर्माण करत आहेत, ड्रग्ज बाबत कारवाई ही महत्वाची आहे. व्हिडीओ किंवा फोटो कॉप केला असावा त्यांनी दिले आता खर आहे असं बोलता येणार नाही तपास होवू द्या. मलिक जावईला अटक केल्यापासून वेगवेगळी वक्त्याव्य करत आहेत भाजपला मुद्दाम बदनाम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत असं देखील दरेकर म्हणाले.

फडणवीस आले तर श्रेय मिळणार नाही...

कोकणातील महत्वाच प्रकल्प आहे, सर्वांना बरोबर घेऊन उद्घाटन व्हायला हवं होतं महाविकास आघाडी सरकार MVA Goverment प्रत्येक गोष्टीत श्रेय घेत आहेत फडणवीस Fadanvis आले तर श्रेय मिळणार नाही म्हणून नाव टाकलं नाही चिपी Chipi साठी भाजपने योगदान दिलं आहे.

Edited By - jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com