नाना पटोलेंना राजकीय कावीळ झाली आहे; प्रविण दरेकरांचा घणाघात!

नाना पटोले Nana Patole हे 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' तसे 'बैठकीत मुजरा आणि मीडिया समोर गोंधळ' करत आहेत.
नाना पटोलेंना राजकीय कावीळ झाली आहे; प्रविण दरेकरांचा घणाघात!
नाना पटोलेंना राजकीय कावीळ झाली आहे; प्रविण दरेकरांचा घणाघात!SaamTV

मुंबई : ओबीसी आरक्षणावरुन OBC Reservation स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत जो तिढा निर्माण झाला होता तो सोडविण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी CM बोलावली होती. या बैठकीमध्ये जोपर्यंत ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने घेतला आहे. Pravin Darekar's harsh criticism on Nana Patole

मात्र बैठक संपल्यावर बाहेर येताच एकमेकांवरती आरोप न करतील ते राजकारणी कसले. या बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर Pravin Darekar यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारला MVA दीड वर्षात इम्पिरिकल डेटा जमा करता आला नाही आणि यामुळेच ओबीसींच राजकीय आरक्षण OBC political reservation संपुष्टात आलं असल्याची टीका केली तसेच नाना पटोले हे 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' तसे 'बैठकीत मुजरा आणि मीडिया समोर गोंधळ' करत असून त्यांना राजकीय कावीळ झाला आहे' अशी घणाघाती टीका प्रविण दरेकरांनी नाना पटोलेंवरती Nana Patole केली आहे.

हे देखील पहा-

आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांचे कौतुक केले मात्र बाहेर माध्यमांशी बोलताना ते वेगळं वक्तव्य करत आहेत, यांमुळं नाना पटोले यांचा नवा चेहरा बघायला मिळाला असेही दरेकर म्हणाले तसेच नाना भाजप BJP वर आरोप करता करता काँग्रेसची Congres भूमिका विसरले आहेत. न्यायालयात पिटीशन दाखल करणारे विकास गवळी हे काँग्रेसचेच आहेत अशी आठवणही दरेकरांनी यावेळी पटोलेंना करुन दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षात इम्पिरिकल डेटाImperial data जमा करता आला नाही त्यामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले असून या समाजाचे आरक्षण जाण्यास हे राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार असल्याची टीकाही दरेकरांनी केली तसेच ओबीसी अरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांनी ज्या सूचना केल्या होत्या त्याच सरकारने पुढे केल्या असल्याचही दरेकर म्हणाले.

नाना पटोलेंना राजकीय कावीळ झाली आहे; प्रविण दरेकरांचा घणाघात!
Reservation : इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक - फडणवीस

आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये सर्वांचे एकमत असून राज्य मागासवर्ग आयोगाला सांगून इम्पिरीकल डाटा मागवून घेणार आहोत तसेच या आरक्षणावरती तोडगा निघत नाही तो पर्यंत निवडणूका होणार नाहीत यासाठी मागासवर्गीय आयोगाला तात्काळ इम्पिरीकल डेटा गोळा करण्यास सांगणार आहे. तसेच निवडणूका पुढे ढकलण्यावर सर्वांचे एकमत आहेच शिवाय आज मी केलेल्या सुचनांसदर्भाही मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्म असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com