President Election : शिवसेनेनं चर्चेची दारं कधीच बंद केली नाहीत; संजय राऊतांचं मोठं विधान

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवसेनेचा भाजपशी संवाद होऊ शकतो.
President Election : शिवसेनेनं चर्चेची दारं कधीच बंद केली नाहीत; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP Saam TV

अयोध्या: येत्या 20 जूनला राष्ट्रपती पदासाठी (President Election) निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी मोर्चाबांधणी सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेत आता शिवसेना (shivsena) देखील सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवसेनेचा भाजपशी संवाद होऊ शकतो. भाजपसाठी शिवसेनेची दारं सदैव खुली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Shivsena Sanjay Raut Latest Marathi News)

Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP
मोठी बातमी! नवाब मलिकांचं मंत्रिपदही जाणार?; भाजपने घेतला मोठा निर्णय

शिवसेना नेते संजय राऊत हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येवरून त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, शिवसेनेने राष्ट्रीय प्रश्नावर कधीच खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने सदैव चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवसेनेचा भाजपशी संवाद होऊ शकतो. भाजपसाठी शिवसेनेची दारं खुली आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP
Legislative Council Elections 2022: अपक्ष आमदारांची साथ मविआला की भाजपला?

एकीकडे राष्ट्रपतीपदासाठी भाजप उमेदवार ठरवत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर आता भाजप कसा प्रतिसाद देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com