दरेकरांना हादरा! राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष

बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.
Pravin Darekar, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Pravin Darekar, Sharad Pawar, Uddhav ThackeraySaam TV

मुंबई: मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. थोड्याच वेळापुर्वी सह्याद्री अतिथिगृहात अर्थ मंत्री अजीत पवार (Ajit Pawar) आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबै बँकेतील (Mumbai Bank Election) प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Pravin Darekar, Sharad Pawar, Uddhav Thackeray
शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जामीन मंजूर

त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबै बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तन करण्याची रणनिती आखली आहे. त्यानुसार मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष पद हे भाजपकडे राहिले आहे. भाजपचे विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. उपाध्यक्षपद टाय झालं होतं. ईश्वर चिठ्ठी ने उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले निवडून आले आहेत. तसेच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांना महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचीही माहीती समोर आली आहे. मुंबै बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडली आहे.

शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस = ११ संचालक

भाजप = ९ संचालक

मुंबै बँकेचं सत्ता समिकरण असं होतं. विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावरून आता पायउतार व्हावे लागलं होतं. भाजपच्या प्रसाद लाड यांचा दोन मतांनी पराभव झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com