PM Modi Mumbai Visit : उद्या पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; कसा असेल पोलीस बंदोबस्त?

पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
Narendra Modi
Narendra ModiSaam Tv

PM Modi Mumbai Visit Latest News : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने जय्यत तयारी केली असतानाच मुंबई पोलिसांनी देखील पंतप्रधानांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे.

पंतप्रधान हे वांद्रातील एमएमआरडीए मैदाना सभेला संबोधित केल्यानंतर मेट्रो सातच्या उद्घाटनासाठी अंधेरीला जाणार असून यावेळी ते मेट्रो ७ च्या गुंदवली ते मोगरापाडा स्थानकादरम्यान प्रवास करणार आहेत0.

Narendra Modi
Devendra Fadnavis : आपली दुकानदारी बंद होतेय म्हणून विरोधकांची ओरड सुरू; फडणवीसांचा ठाकरे गटाला करारा जवाब

पंतप्रधान मोदींचा (Narendra Modi) हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून पोलिसांनी (Police) अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवला आहे. या संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच वाहतुकीचे देखील नियमन करण्यात आले आहे.

Narendra Modi
Chhagan Bhujbal : MPSCच्या घोळामुळे पत्रकारिता पदवीधरांचा जीव टांगणीला; छगन भुजबळ यांनी वेधले शासनाचे लक्ष

कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त ?

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच पाच पोलीस उपायुक्त यावेळी या परिसरात हजर असतील. त्यांच्या मदतीला 27 एसीपी 171 पोलीस निरीक्षक आणि 397 इतर अधिकारी हजर असतील. तर या संपूर्ण परिसरात बंदोबस्ताकरिता तब्बल अडीच हजार पोलीस अंमलदार त्यात 600 महिला पोलीस आमदार असतील.

या सगळ्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी तसेच शीघ्र कृती दल देखील हजर असेल. स्वतः मुंबई (Mumbai) पोलीस आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवणार असून त्यांच्या जोडीला स्पेशल सीपी आणि इतर सह पोलीस आयुक्त देखील असणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com