KDMC निवडणुकीत महाविकास आघाडीला प्राधान्य : जयंत पाटील

येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी होईल का या प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी दिले आघाडीचे संकेत.
जयंत पाटील
जयंत पाटील प्रदीप भणगे

कल्याण : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज कल्याण मध्ये जिल्हा कार्यालयाचे उदघाटन व कार्यकर्ता मार्गदर्शनासाठी आले होते. यावेळी पाटील यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीकडून कल्याण-डोंबिवली शहरात सर्वच ठिकाणी मोठमोठाले फ्लेक्स लावत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सर्वात प्रथम जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करून पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. यावेळी येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी आम्ही एकत्र सरकारमध्ये काम करतोय ,एकत्र सरकारमध्ये राहायचं आणि वेगळं वागायचं अस आमचं धोरण नाही, असं सांगितलं.

हे देखील पहा :

महाविकास आघाडीमधील पक्ष जिथे जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देऊ. आम्ही ज्यावेळी आघाडीची चर्चा करतो त्यावेळी महापौर बसवण्याचा कोणत्याच पक्षाचा आग्रह नसावा. एकत्रीकरण करण्यात असे अडथळे निर्माण आम्हाला करायचे नाहीत. बहुमत येईल तेव्हा विचार करण्यात येईल असं स्पष्ट केलं. तर, जितेंद्र आव्हाड यांनी देखील आम्ही तिघ एकत्र आहोत, वेळ आल्यावर समीकरण जुळतात असं स्पष्ट केलं.

खड्ड्याचे खापर गत सरकारवर ...

कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मागील सरकारने कल्याण डोंबिवली कडे दुर्लक्ष केलं होतं, आमच्या सरकारची कल्याण डोंबिवली प्रायोरिटी आहे असे आश्वासन देत खड्ड्याचं खापर तत्कालीन भाजपा सरकारवर फोडले.

जयंत पाटील
Nanded : "आमच्या गाडीत कोण पेट्रोल भरतं, हायकोर्टात विचारा"

पप्पू कलानी यांच्याशी राजकीय चर्चा नाही जयंत पाटील यांचा खुलासा...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पप्पू कलानी यांनी मित्र म्हणून बोलवलं होतं त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्ट केलं.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com