Mumbai : तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवरून उडी टाकून कैद्याचे पलायन!

भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या संजय यादव (वय २८) या आरोपीने तुरुंग रक्षकाची नजर चुकवून २५ फूट उंच भिंतीवरून उडी टाकून पलायन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवरून उडी टाकून कैद्याचे पलायन!
तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवरून उडी टाकून कैद्याचे पलायन! विकास मिरगणे

नवी मुंबई : तळोजा कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून कैद्याने पलायन केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या संजय यादव (वय २८) या आरोपीने तुरुंग रक्षकाची नजर चुकवून २५ फूट उंच भिंतीवरून उडी टाकून पलायन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पलायन केलेला आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा :

आरोपी भांडुप येथे राहणारा आहे. २०१८ मध्ये त्याने त्याच्या परिसरातील अल्पवयीन मुलाची हत्या केली होती. त्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास कैदी संजय आणि त्याच्या बराकीतील राहुल जैस्वाल हे दोघेही औषध घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडले.

तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवरून उडी टाकून कैद्याचे पलायन!
शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले!

त्यानंतर दोघेही कारागृहातील रुग्णालयाजवळ गेले असता, तेथील टेहळणी मनोऱ्यावर रक्षक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने दोघे टेहळणी मनोऱ्याचा दरवाजा उघडून वर चढले. त्यानंतर संजयने मनोऱ्याच्या २५ फूट भिंतीवरून उडी टाकली. या वेळी उडी टाकण्यास घाबरलेल्या राहुलला तैनात पोलिसांनी पकडले. मात्र, संजयचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com