Pro kabaddi 2022: कबड्डीचे सादरीकरण आणि समालोचन मराठीत करा अन्यथा...; मनसेचा आयोजकांना इशारा

Pro kabaddi 2022 MNS Politics: 'प्रो कबड्डी लीग'चे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार व डिस्ने हॉटस्टार व्यवस्थापनाला मनसेकडून याबाबत सविस्तर पत्र लिहीण्यात आलं आहे.
Pro kabaddi 2022 MNS Politics:
Pro kabaddi 2022 MNS Politics:Saam TV

रुपाली बडवे, मुंबई

मुंबई: प्रो कबड्डी लीगचा ९ वा हंगाम (Pro Kabaddi 2022) सुरू होणार आहे. यासाठी सध्या लीलाव प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कबड्डीचे सादरीकरण आणि समालोचन हे हिंदी भाषेत होते, मराठीत ते होत नाही. याच मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मैदानात उतरली आहे. 'प्रो कबड्डी लीग'च्या सामन्यांचे सादरीकरण हे मराठी भाषेत करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी आयोजकांकडे केली आहे. (Pro Kabaddi 2022)

Pro kabaddi 2022 MNS Politics:
Video: 'देव तारी त्याला कोण मारी' १६ सेकंदात दोन वेळा मृत्यूला दिला चकवा; थरारक घटनेतून मिळेल मोठा संदेश

'प्रो कबड्डी लीग'चे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार व डिस्ने हॉटस्टार व्यवस्थापनाला मनसेकडून याबाबत सविस्तर पत्र लिहीण्यात आलं आहे. तसेच ठरलेल्या वेळेत इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेचा समावेश न केल्यास स्टार प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा मनसेने आयोजकांना दिला आहे.

मनसेने लिहीलेल्या पत्रात म्हटलं की,

क्रिकेट सामन्यांचे समालोचन इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेतही व्हावे म्हणून मागील काळात आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. आता दिनांक ७ ऑक्टोंबर २०२२ पासून प्रो कबड्डी लीगचा ९ वा हंगाम सुरु होत आहे आणि त्यात मराठी भाषेचा पर्याय नाही असे समजते. या सामन्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन टीम खेळत आहेत. तसेच या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील मराठी खेळाडुंचा समावेश आहे.

इतकेच काय तर मुळात कबड्डी आणि खो-खो हे खेळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले आहेत. कबड्डीसाठीचा बुवा साळवींचे योगदान आपणांस माहीत असेलच. ऑल इंडीया कबड्डी फेडरेशनच्या स्थापनेतील बुवा साळवींचे योगदान विसरुन चालणारे नाही. महाराष्ट्राचे कबड्डीशी इतके घट्ट नाते असतानादेखील प्रो कबड्डीच्या सामान्यांचे मराठी भाषेत सादरीकरण का नाही? हा प्रश्न तमाम मराठीजनांना सतावत आहे.

Pro kabaddi 2022 MNS Politics:
आम्ही मांजरप्रेमी! हरवलेल्या बोक्याला शोधण्यासाठी शहरात लावले पोस्टर; ३ दिवसांनी लागला 'मन्या'चा शोध

याद्वारे आपणांस कळविण्यात येते की, या सामन्यांचे मराठी भाषेत सादरीकरण व्हावे, यासाठी त्वरीत पाऊले उचलावी. तसेच दि. ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी होणाऱ्या सामन्यांचे सादरीकरण मराठी भाषेत करावे ही विनंती. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या संघटनेचे शिष्टमंडळ दिनांक १५/०८/२०२२ रोजी ०१:३० वाजता आपल्या कार्यालयात येणार असून, चर्चेसाठी वेळ राखून ठेवावा. तसे न झाल्यास तमाम मराठीजनांच्या रोषाला आपणांस सामोरे जावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com