विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता.
राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र Saam Tv

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य आहे, असा उल्लेख राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. (Process of changing rules for election of Assembly Speaker is unconstitutional Governor send letter to CM)

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) काय भूमिका घेणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा -

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक, महाविकास आघाडीचे मंत्री राज्यपालांची भेट घेणार

महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी रविवारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळपासूनच सरकार आणि राज्यपालांमध्ये पत्र व्यवहार सुरू होते. कॅबिनेटने प्रस्ताव पाठवल्यावर महाविकास आघडीच्या मंत्र्यांनी राज्यपालांना भेटून पत्र दिले. तसेच, निर्णय घेण्याबाबत विनंती केली होती.

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हिवाळी अधिवेशन: गोपीचंद पडळकरांना जीवे संपवण्याचा सरकारचा डाव- फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

त्यानंतर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून याबाबत मी कायदेतज्ञांचे मत जाणून घेत आहे, असं कळवलं होतं. त्यानंतर सरकारने राज्यपालांना कायतेतज्ञांचं मत घेऊन लवकर निर्णय कळवावा, ही विनंती करणारे पत्र पठवले होते. कारण, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी महाविकास आघडी सरकारची आग्रही भूमिका होती.

कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची चाचपणीही करणे महाविकास आघाडी सरकारने सुरु केले होते. आज दुपारी साडे तीन वाजता कॅबिनेटची बैठक होणार होती. या बैठकीत उपलब्ध पर्यायांबाबत चर्चा होणारे होती. मात्र, त्यानंतर आता राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य आहे, असं स्पष्ट केलं आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com