कल्याण ते कसारा नव्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविणार

कल्याण ते कसारा तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविणार असल्याची माहिती कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी दिली आहे.
कल्याण ते कसारा नव्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविणार
कल्याण ते कसारा नव्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविणारप्रदीप भणगे

कल्याण : कल्याण (Kalyan Junction) ते कसारा (Kasara Railway Station) रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन (New Railway Line) विकसित करण्यासाठी जमीन संपादन (land acquisition) करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवड्यात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील (Kalyan Sub-Divisional Officer Abhijit Bhande-Patil) यांनी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान होऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी सांगितले. (process of land acquisition for new railway line Kalyan to Kasara will be implemented compulsorily)

हे देखील पहा -

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी 9.84 हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या प्रकल्पात बेरे, राये, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, आंबिवली, मांडा, अटाळी, चिकणघर या गावातील जमीन बाधित होत आहेत. यामध्ये सातबाराचे 248 गट आहे. जमीन संपादनाकरीता उपविभागीय कार्यालयाकडून जमीनीच्या थेट खरेदीची प्रक्रिया राबविली गेली होती. त्यास अत्यल्प प्रतिसाद आला, 248 पैकी केवळ 5 गटांचे संपादन करण्यात आले आहे.

कल्याण ते कसारा नव्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविणार
मोठा निर्णय.. शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपात, पालकांना मोठा दिलासा

कल्याण कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्याचा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादन तातडीने होण्याकरीता थेट खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यातून संपादन होत नसल्याने आत्ता सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या आठवड्यात केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com