Maharashtra Police: पोलीस दलातील पदक विजेत्या खेळाडूंची पदोन्नती रखडली; 200 पेक्षा अधिक खेळाडू प्रतीक्षेत

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खेळाडूंमध्ये नाराजी
Maharashtra Police
Maharashtra PoliceSaam Tv

संजय गडदे

Mumbai News: महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालेल्या खेळाडूंना अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा , आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,व नॅशनल क्रीडा स्पर्धा यामध्ये पदक प्राप्त केल्यावर एक टप्पा पदोन्नती देण्यात येते.

मात्र नऊ वर्ष उलटून गेल्यानंतरही ही पदोन्नती देण्यात आली नसल्याने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील 200 पेक्षा अधिक पदक विजेते खेळाडू पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. (Latest Marathi News)

Maharashtra Police
Maharashtra Politics: पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत; वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर,11 जूनला मतदान

महाराष्ट्र पोलीस (Police) दलातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्रालयाने एक टप्पा पदोन्नती योजना सुरू केली. या योजनेनुसार महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या खेळाडूंना अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,व नॅशनल क्रीडा स्पर्धा यामध्ये पदक प्राप्त केल्यावर एक टप्पा पदोन्नती देण्यात आली.

मात्र 2008 ते 2014 दरम्यान पदोन्नती रोखण्यात आल्यानंतर प्रकरण मॅट न्यायालयाकडे गेले. मॅट कोर्टाने सदर खेळाडूंना पदोन्नती देणे बाबतचे आदेश दिले.मॅटकोर्टाच्या निर्णयानुसार 2014 पर्यंतच्या खेळाडूंना पदोन्नती देण्यात आली.

केरळ,राजस्थान,पंजाब,उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे राज्य त्यांच्या पोलीस दलातील खेळाडूंना अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना एक टप्पा पदोन्नती देत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील पदक विजेत्या खेळाडूंना मॅट कोर्टाच्या निर्णयानुसार 2014 मध्ये एक टप्पा पदोन्नती देण्यात आली.

Maharashtra Police
Kalyan News: महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप; वीज चोरीचे तब्बल 105 प्रकरण

मात्र तेव्हापासून ही पदोन्नती पुन्हा रखडली असल्याने महाराष्ट्र पोलीस दलातील पदक विजेत्या खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे.संजय पांडे हे पोलीस महासंचालक असताना जून 2021 रोजी शासन निर्णय होण्याकरता पदक प्राप्त खेळाडूंची फाईल मंत्रालयामध्ये पुटअप केली आहे. (Maharashtra News)

एक टप्पा प्रमोशन नाकारले गेल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. स्वतःचे व पोलीस दलाचे नाव उंचवण्याकरता केलेल्या परिश्रमांना आता पूर्णविराम लागतो की काय असे विचार महाराष्ट्र पोलीस दलातील पदक विजेते खेळाडू खाजगीत विचारत आहेत. जर प्रमोशन बंद होणार असतील तर खेळाडूंनी भरती व्हावे की नाही असा प्रश्न देखील पोलीस खेळाडूंमध्ये चर्चिला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com