"कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढलेलं नाही"; शिंदेंच्या आरोपांनंतर गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Political Crisis In Maharashtra : महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि आहे, याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.
eknath shinde allegations shivsena news
eknath shinde allegations shivsena newsSaam Tv

मुंबई: बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, असे ट्विट शिंदे यांनी केले होते. याबाबत आता राज्याच्या गृहमंत्रालयाकडून हा दावा खोडून काढण्यात आला आहे. कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढलेलं नाही असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील वाचा -

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावर आरोप

एकनाथ शिंदे यांनी आज, शनिवारी ट्विट करून खळबळ उडवून दिली. 'राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे,' असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि आहे, याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.

शिवसैनिक आहात तर बकरीसारखे बेबे का करता?

बंडखोर आमदारांवर निशाणा साधनताना राऊत म्हणाले की, बंडखोर आमदारांबाबत राऊत म्हणाले की, ते महाराष्ट्राच्या बाहेर ढुंगणाला पाय लाऊन पळाले. भिकाऱ्यासारखे का फिरताय? शिवसैनिक आहात तर बकरीसारखे बेबे का करता? फ्लोअर हाऊसमध्ये कोणात किती दम हे समजेल असं म्हणत त्यांनी बंडखोरांना धारेवर धरले आहे.

एकनाथ शिंदेंच्या आरोपांनंतर गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपानंतर काही वेळातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदेंचा दावा खोडू काढला. गृहमंत्री म्हणाले की, "राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत." असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे देखील पाहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com