Pune Crime : धक्कादायक! 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसाकडून बलात्कार

पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने २९ वर्षीय महिला वकिलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली
Pune Crime : धक्कादायक! 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसाकडून बलात्कार
Pune Crime : धक्कादायक! 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसाकडून बलात्कारSaam Tv

पुणे : पुणे (Pune) ग्रामीण पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने २९ वर्षीय महिला वकिलावर बलात्कार (abuse) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पोलिसाने पीडित महिलेला लग्नाचे आमिष (marriage) दाखवून विविध ठिकाणी नेहून तिच्यावर बलात्कार केला आहे. मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. या प्रकरणी पीडित महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी (police) बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पहा-

लक्ष्मण गंगाधर राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या ३३ वर्षीय आरोपी पोलिसाचे नाव आहे. आरोपी राऊत हा सध्या पाषाण परिसरामधील पत्रा चाळ या ठिकाणी वास्तव्याला असून तो मूळचा लोणी काळभोर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राऊत हा एका मेट्रोमोनिअल साइटवरून फिर्यादीबरोबर ओळख केली होती. या संकेतस्थळावर संवाद साधल्यावर आरोपी राऊत याने पीडित महिलेचा मोबाइल नंबर घेतला होता. यामधून त्याने संवाद साधत पीडितेशी ओळख वाढवली होती. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित महिलेबरोबर वेळोवेळी लैंगिक शोषण केले आहे.

Pune Crime : धक्कादायक! 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसाकडून बलात्कार
पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

आरोपीने पीडित महिला वकिलाला देहूरोड, पिंपळे निलख परिसरातील विविध लॉजवर घेऊन जात तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आहे. मागील पावणे २ वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने पीडित महिला वकिलाशी लग्न करण्यास नकार देत, तिची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर पीडित वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जात, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण राऊत विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com