Pune : अपघातांची मालिका थांबेना! नवले पुलाजवळ ट्रक चारचाकीवर उलटला

पुण्यातील नवले ब्रीजजवळ भीषण अपघात झाला आहे. कात्रज देहू बाह्यमार्गावर सिमेंट काँक्रिट मिक्सर हा थेट चारचाकीवर पलटी झाला आहे.
Pune accident news
Pune accident news Saam Tv

पुणे : पुण्यातील (Pune) नवले ब्रीजजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. कात्रज देहू बाह्यमार्गावर सिमेंट काँक्रिट मिक्सर हा थेट चारचाकीवर पलटी झाला आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कात्रजकडून नवले पुलाजवळ येताना चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला आहे. ( Pune Accident News In Marathi )

Pune accident news
Gold-Silver Price Today : गोड बातमी! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

कात्रज देहू बाह्यमार्गावरून नवले पुलाजवळ सिमेंट काँक्रिट मिक्सर येत होता. मात्र, या वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक पोलिसांनी दिली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. सदर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने या अद्याप कोणाचीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सकाळी ऐनवेळेच्या सुमारास हा अपघात झाल्याने नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर अपघातानंतर भारती विद्यापीठाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Pune accident news
संतापजनक! ७ वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

या भीषण अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच रस्यावर बघ्यांची गर्दी झाली आहे. तसेच वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून रस्त्यावरील वाहने बाजूला सारू वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सदर अपघाताने नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. याआधी झालेल्या अपघातात जीवितहानी देखील झाली आहे. त्यामुळे नवले पुलाजवळ सातत्याने अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन पावले उचलत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com