Pune Accident: पुण्यात कंटेनर आणि चारचाकीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पुण्यात कंटेनर आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
Pune Accident
Pune AccidentSaam Tv

पुणे : पुण्यात कंटेनर आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. जांभुळवाडी दरीपूलजवळ हा अपघात झाला. या अपघातात चारचारकीचा चक्काचूर झाला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे (Pune Accident Of Container And Car One Died).

Pune Accident
Nandurbar: बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जखमी

पुण्यातील (Pune) कात्रज नवीन बोगद्यातून बाहेर आल्यावर जांभूळवाडी दरीपुलाजवळ हा भीषण अपघात (Accident) झाला. कंटेनर आणि चारचाकी (Car) यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यावेळी बाजूनी जाणाऱ्या दुचाकीलाही टक्कर बसली. दुचाकी वर दोघेजण प्रवास करत होते. रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातात एकाचा जागीच मृत्यू (Death) झालाय.

Pune Accident
सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात! सहाजण गंभीर जखमी

अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनल घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला. तर, चारचाकीचा अक्षरश: चुराडा झाला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com