Pune Accident: पुण्यात अपघातच सत्र थांबेना! शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात

शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक
Pune Accident
Pune Accident Saam Tv

सचिन जाधव

पुणे - हडपसर सासवड रस्त्यावर मध्यरात्री शिवशाही एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात (Pune Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनरच्या चालकाचा मृत्यू झाला असून दोन ते तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम केले जात आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. (Pune Shivshahi bus accident)

Pune Accident
Dasara Melava: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? आज निर्णय होण्याची शक्यता

नेमका कसा झाला अपघात?

सासवड रोडवरील उरळी देवाची फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून कंटेनर सासवड रस्त्यावर आला. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने येणारी पंढरपूर-पुणे शिवशाही एसटी बस अचानक आडव्या आलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात एसटी चालक व प्रवासी गंभीर जखमी झाले तर कंटेनरच्या चालकाचा मृत्यू झाला. यात बसचा समोरील भाग व कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.

क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त शिवशाही बसला रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आलं. दरम्यान, या अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळानंतर पूर्ववत झाली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com