रात्रीची वेळ, भरधाव ट्रक उलटून थेट हॉटेलात घुसला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

बारामतीच्या सुपे येथे भीषण अपघात झाला. ट्रकचालक हा दारू प्यायला होता अशी माहिती समोर आली आहे.
Baramati Supe Accident News In Marathi
Baramati Supe Accident News In MarathiSAAM TV

सुपे (बारामती): बारामतीच्या सुपे येथे एक धक्कादायक घटना घडली. चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सोंड परिसरात वळणावर एका हॉटेलमध्ये भरधाव ट्रक थेट घुसला. या भीषण अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. अपघात झाला त्यावेळी ट्रकचालक हा दारूच्या नशेत होता. तो घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समजते. (Baramati Accident Latest News)

Baramati Supe Accident News In Marathi
Mumbai Local : अपघात टाळण्यासाठी मोटरमनवर सीसीटीव्हीची नजर, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

बारामती तालुक्यातील सुपे परिसरात रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव मालवाहू ट्रक थेट हॉटेलात घुसून चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला. तर तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत. रुकसाना दिलावर काझी (वय ४५, राहणार सुपे, तालुका बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दिलावर इस्माईल काझी (वय ५०), सोयल दिलावर काझी (वय २५) हे किरकोळ जखमी झाले आहेत. मुजाईद अली अहमद अली सय्यद (रा. बिजनोर, ता. धामपूर, उत्तर प्रदेश) यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.

Baramati Supe Accident News In Marathi
ह्रदयद्रावक: खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 3 भावंडांचा जागीच मृत्यू

वळणावरच उलटला ट्रक

सुपे परिसरातील चौफुला-मोरगाव रस्त्यावर सोंडनजीक वळणावर हा भीषण अपघात झाला. अनियंत्रित भरधाव ट्रक उलटून थेट हॉटेलात घुसला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस (Police) ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युन्नूस इब्राहिम काझी यांनी या घटनेची फिर्याद दिली. साखर भरलेला ट्रक मोरगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला. त्यानंतर तो थेट हॉटेलमध्ये घुसला. अपघातानंतर दारूच्या नशेत असलेला ट्रकचालक हनुमंत भालके (राहणार, निलंगा, पूर्ण नाव, पत्ता कळू शकलेला नाही) हा पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

या अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला. अपघात घडला त्यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे तिथेच होते. वेगात असलेला हा ट्रक काही कळायच्या आत उलटून मोठा आवाज झाला. अपघाताची स्थिती पाहून तातडीने चौफुल्यावर जाऊन क्रेन आणली. तोपर्यंत सुपे येथील रणजीत खैरे यांनी जेसीबीच्या मदतीने आणि काही तरूणांनी ट्रकमधील साखरेची पोती बाहेर काढली. शौकत कोतवाल, राहुल भोंडवे, पोपट खैरे आदींनीही मदत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com