पुण्यासह औरंगाबादमध्ये ED चे छापे; मलिकांच्या अडचणी वाढणार?

मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यात त्यांच्या खात्याचे लोक असु शकतात असे मत तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे.
पुण्यासह औरंगाबादमध्ये ED चे छापे; मलिकांच्या अडचणी वाढणार?
पुण्यासह औरंगाबादमध्ये ED चे छापे; मलिकांच्या अडचणी वाढणार?Saam TV

पुणे: वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळा प्रकरणी मुश्ताक अहमद शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. मी तीन नोव्हेंबरला इडीकडे तक्रार दिली होती. वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले. त्यासाठी वक्फ बोर्डाच्या सीईओनी एनओसी दिली होती. त्यामुळे यामधे मोठे लोक सहभागी असु शकतात.

पुण्यासह औरंगाबादमध्ये ED चे छापे; मलिकांच्या अडचणी वाढणार?
शरद पवार गडकरींना म्हणाले केंद्र सरकारमधील सहकार क्षेत्रातील तारणहार

मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यात त्यांच्या खात्याचे लोक असु शकतात असे मत तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे. हिंजवडी आयटीपार्कजवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडीने इतक्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी आहे असेही मुश्ताक अहमद शेख म्हणाले.

दरम्यान ईडीने सकाळपासूनच धाडी टाकायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरातील उद्योजक ईडीच्या निशाण्यावर आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून दोन जणांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. अजुनही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये नक्षत्रवाडी परिसराचा समावेश आहे. दोन बड्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये आपदा संपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर हे धाडसत्र सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com