Pune: 'तू माझी नाही तर ..... ,' विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

प्रशांत व तरूणीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रि आणि त्यानंतर प्रेमात झाले. गेली ३ ते ४ वर्ष दोघेही प्रेमात होते.
Pune: 'तू माझी नाही तर ..... ,' विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह
'तू माझी नाही तर ..... ,' विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाहSaam Tv

धायरी - जातीवरून कुटूंबियांनी विरोध केल्यानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केला. पण, त्यानंतरही प्रियकर प्रियसीला त्रास देत होता. “तु माझी आहेस, तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत प्रियसीला त्रास देत होता. त्याने प्रियसीचा ठरलेलं लग्न देखील मोडला. प्रशांत हागवणे असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व तरूणीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रि आणि त्यानंतर प्रेमात झाले. गेली ३ ते ४ वर्ष दोघेही प्रेमात होते. या दोघांना लग्न देखील करायचे होता. तरूणीच्या कुटूंबाने या लग्नाला परवानगी दिली होती. मात्र, प्रशांतच्या कुटूंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यातच तरूणी दुसऱ्या जातीची असल्याने प्रशांतने त्याच्या कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर पीडित तरूणीने प्रशांतशी संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधत तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

'तू माझी नाही तर ..... ,' विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह
दिल्लीत पाकिस्तानी अतिरेकी सापडला; AK-47, हँडग्रेनेड जप्त

तिला सतत फोन करून तसेच इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्रास दिले. दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह तुझ्या आई - वडिलांना मारून टाकण्याची धमकी देखील त्याने दिली. तसेच, ज्या तरुणाशी या तरुणीचा विवाह ठरला होता. त्या तरूणाची भेट घेऊन हा विवाह देखील प्रशांतने मोडून तरूणीला त्रास दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.